Friday 11 September 2020

राजुर येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड सेंटर सुरु करुन 50 ऑक्सीजन बेडसह पाच व्हेंटीलेटरची उभारणी करण्याच्या सुचना

 



          जालना दि. 11 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकतीच राजुर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देत या ठिकाणच्या वैद्यकीय सोई-सुविधांचा आढावा घेतला.

            यावेळी उप विभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार संतोष गोरड, जिल्हा शल्य चिकित्सक             डॉ. अर्चना भोसले,डॉ. पाटील, वैद्यकीय अधिकारी संदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.

         यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.  तालुक्याच्या ठिकाणच्या कोरोनाबाधित रुग्णांना त्याच तालुक्यात उपचार मिळावेत यासाठी राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड सेंटर सुरु करुन या ठिकाणी 50 ऑक्सीजन बेड तसेच 5 व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  या सुविधेमुळे भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज पडणार नसल्याचे सांगत रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेस यांच्यासाठी उभारण्यात आलेली निवासस्थानेही उत्तम प्रकारची असल्याने समाधान व्यक्त करत राजुर संस्थानची मोठे सहकार्य  प्रशासनास मिळत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.

*******

No comments:

Post a Comment