Friday 4 September 2020

जिल्ह्यात 164 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 54 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

      जालना दि.4 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 54 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर  

जालना येथील वसुंधरा नगर -1, शिवाजीनगर-1, संभाजी नगर -1, गांधी चमन-2, सिंगल जिन -1, वृंदावन कॉलनी -1, खासगी रुग्णालय-3, नुतन वसाहत-1, आनंदी स्वामी गल्ली-1, सकलेचा नगर-2, एस.आर.पी.एफ. निवासस्थान -2 जालना तालुक्यातील  नागेवाडी -1, बोरखेडी -1, पिंपळवाडी-2, सेवली-1, गोंदेगाव-1, राममुर्ती-1, पाथ्रुड-1, हीवर्डी -1, मंठा तालुक्यातील पोलीस स्टेशन -1, रानमळा -2, पांगरी गोसावी-1, माळेगाव-1, परतुर तालुक्यातील द्रौपदानगर -2, साळेगाव-1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर-1, तिर्थपुरी-1, रवना-3, राणी उंचेगाव-20, पिंपरखेड -3, देवहिवरा -1, कुंभार पिंपळगाव-2, पिंपरखेड-1, अंबड तालुक्यातील अंबड शहर-4, शिक्षक कॉलनी-2, नुतन वसाहत-2, सुखापुरी  तांडा-2, रामसगांव-2, रोहिलागड-1, जामखेड-2, सराटे अंतरवाली-2, सुतगिरणी-2, बदनापुर तालुक्यातील निकळक-2, दुधनवाडी-2, गोकुळवाडी-2, गेवराई बाजार-1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-1, भारज बु-1, अकोलादेव -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर-6, गणेशनगर-2, चांदई एक्को-1, गोद्री-1, कार्ला-2, नांजा-1, जैनपुर कोठारा-1 इतर जिल्हा मोहाडी ता. सिंदखेडराजा-1, दुसरबीड ता. सिंदखेडराजा-1, चिखली जिल्हा बुलढाणा-1, बुलढाणा शहर -1, बजाजनगर औरंगाबाद-2,परळी वैजनाथ जिल्हा बीड-1,   अशा प्रकारे RT-PCR तपासणीव्‍दारे 114 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 50 व्यक्तींचा अशा एकुण 164 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11515असुन सध्या रुग्णालयात-281 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4034, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-268,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-37026 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-164(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5252 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-31360, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-314, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3638

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-20, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3534 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-252,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-670,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-281,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-54, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3925, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1177(25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-54763 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 150 एवढी आहे.

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 670 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-61, जे.. एस. मुलींचे वसतिगृह-19,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-30, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-18, पोलीस प्रशिक्षण केंद्र-200,मॉडेल स्कूल परतुर-10,के.जी.बी.व्ही.परतुर-18,के.जी.बी.व्ही.मंठा-31,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,अंबड-45,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-46, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-29, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-71,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-24,शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-37, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-3, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन-5, पंचकृष्ण मंगल कार्यालय, जाफ्राबाद-1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-22.

            जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 17 नागरीकांकडुन  3 हजार 450  तर आजपर्यंत जिल्‍ह्यातील आठही तालुक्‍यात मास्‍क न वापरणे , सोशल डिस्‍टंसिंगच्‍या नियमाचे पालन न करणा-या एकुण  4 हजार 524 नागरीकांकडुन 9 लाख 57  हजार 210  रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.

                                                               -*-*-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment