Saturday 7 November 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

             जालना दि.7 (जिमाका):-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा आज दि. 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.  

            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सवडे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) रवींद्र परळीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 74 मतदान केंद्राची पहाणी करण्यात यावीनिवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी मतदारांना  आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावेराजकीय पक्षांकडून जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभांचे तंतोतंत चित्रीकरण करण्याबरोबरच स्थापन करण्यात आलेल्या फ्लाईंग स्क्वाड, व्हिडीओ सर्व्हीलेन्स यासह इतर पथकांनी कार्यक्षमतेने काम करावे. या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर न करता मतदान हे बॅलेटपेपरवर घेण्यात येणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

            कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर आरोग्याच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात मास्क, सॅनिटायजर, हात धुण्यासाठी साबण, पाणी आदी उपलब्ध राहण्याबरोबरच या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल, यादृष्टीकोनातुन आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  

            बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, पोलीस विभागातील प्रमुख अधिकारी यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*******                                                                                          

No comments:

Post a Comment