Tuesday 3 November 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न

 




             जालना दि.3 (जिमाका):-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (निवडणूक) रवींद्र परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आज दि. 3 नोव्हेंबर रोजी  राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत  बैठक संपन्न झाली.

            यावेळी बहुजन समाजपार्टीचे रमेश उबाळे, भारतीय जनतापक्षाचे सचिन जाधव, भारतीय कम्युनिष्ट पार्टीचे श्री मिसाळ, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे मोहसीन पठाण, शिवसेना पक्षाचे दीपक रननवरे, राष्ट्रवादी पक्षाचे निसार देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे बाळु जाधव आदींची उपस्थिती होती. 

            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री परळीकर म्हणाले, 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार असुन  दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहणार आहे. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल तर दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होणार असुन मतमोजणी  ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगत या निवडणुकीच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही उपजिल्हाधिकारी                    श्री परळीकर यांनी यावेळी केले.  

*******

No comments:

Post a Comment