Wednesday 8 November 2023

पोक्सो प्रकरणात सहाय्यक व्यक्ती म्हणुन काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी अर्ज करावेत

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :-  लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (पोक्सो) नियम 5 (1) नुसार प्रकरणात सहाय्यक व्यक्ती असणे आवश्यक आहे. जेणेकरुन पोक्सो प्रकरणामध्ये आवश्यकतेनुसार बाल कल्याण समिती अशा व्यक्तींची सहाय्यक व्यक्ती म्हणुन नियुक्ती करु शकते. तरी सामाजिक भावनेतून विना मोबदला तत्वावर सहाय्यक व्यक्ती म्हणुन काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी गुरुवार दि.23 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत,  असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे. 

सहाय्यक व्यक्तीची भुमिका म्हणजे पोक्सो केसेस मधील बालिकांचे व कुटुंबाचे समुपदेशन करणे, त्यांना कायदेविषयक मदत व मार्गदर्शन करणे, तसेच गरजेनूसार व बाल कल्याण समितीच्या आदेशाने योग्य ती सर्वतोपरी मदत करणे. या कामाचा कोणताही मोबदला किंवा मानधन संबंधित सहाय्यक व्यक्तीस अनुज्ञेय असणार नाही. या अनुषंगाने सामाजिक भावनेतून विना मोबदला तत्वावर सहाय्यक व्यक्ती म्हणुन काम करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी (विविध भाषातज्ञ/कायदेतज्ञ, समुपदेशक, दुभाषी, अनुवादक, विशेष शिक्षक, बाल हक्क किंवा बाल संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था ) बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह दि.23 नोव्हेंबर 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे अर्ज सादर करावेत.  असेही प्रसिध्दीत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment