Thursday 9 November 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


 

जालना दि. 9 (जिमाका) :-  राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीराचे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दि.9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आदि उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयाविषयी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.  मुख्यतः जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे महत्त्वाचे कार्य मोफत कायदेविषयक सल्ला व मदत, मोफत समुपदेशन, मध्यस्थी, वकीलांची मोफत सेवा पुरविणे, लोकअदालत, कायदेविषयक शिबीरे, कार्यक्रम, कायदेविषयक चिकित्सा केंद्र, मध्यस्थी केंद्र असे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विविध शासकीय कार्यालयामधील समन्वय आपण कशाप्रकारे साधला पाहिजे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वागण्यामध्ये आपण कसा बदल घडवुन आणला पाहिजे याबद्दल माहिती देत कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेवटी लोकांचे हित हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवुन काम केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment