जालना, दि.
24 (जिमाका) –जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने
जालना शहरात आयोजित 14 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो-खो
स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासुन सुरू होत्या, त्यामध्ये आज मुले व मुली दोन्ही
गटाचे अंतिम सामने घेण्यात आले, यात लातूर विभागातील श्रीपतराव भोसले हायस्कूल,
धाराशिव
संघाने दोन्ही गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे
बक्षीस वितरण जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडुंचे त्यांनी शब्द सुमनाने स्वागत करून विजयी
खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरणामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतुन प्रथमच
राज्यस्तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडुंना जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा
नियोजन समीतीच्या माध्यमातून
टि-शर्ट व कॅप देण्यात आल्या. तसेच विजेत्या संघातील खेळाडुंना व राष्ट्रीय स्पर्धेसाठी
राज्यसंघात निवड झालेल्या खेळाडुंना उत्कृष्ट अशा स्मार्टवॉच सुद्धा देण्यात
आल्या. असा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला.
स्पर्धेचा
अंतीम निकाल पुढील प्रमाणे - मुले प्रथम - श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव
(लातूर विभाग), द्वितीय - आत्मामालीक इंग्लिश मेडीयम गुरूकुल अॅण्ड ज्युनीयन
कॉलेज, कोकमठाम ता. कोपरगाव जि. अहमदनगर (पुणे विभाग), तृतीय - राजश्री छ. शाहु
कनीष्ठ विद्यालय नवी मुबंई (मुंबई विभाग),
मुली-
प्रथम - श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव (लातूर विभाग), द्वितीय - जिल्हा परीषद
प्रा. शाळा भिकवडी बु. ता. खानापुर जिल्हा सांगली (कोल्हापूर विभाग), तृतीय - रा.
फ . नाईक विद्यालय कोपरखैरणे, ता. जि. ठाणे (मुंबई विभाग).
याच
स्पर्धेतुन रांची, झारखंड याठिकाणी संपन्न होणा-या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी
महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर करण्यात आला तो पुढील प्रमाणे मुले- सोत्या कुसना
वळवी, हारद्या सांत्या वसावे, भिमसिंग गारद्या वसावे (जिल्हा धाराशिव विभाग लातुर)
जितेंद्र दिवाल्या वळवी,
उमेश शिवा वळवी (जिल्हा अहमदनगर विभाग पुणे) ओंकार राजाराम सावंत (जिल्हा मुबंई
विभाग मुबंई), निलेश युवराज गवळी (जिल्हा व विभाग नाशीक), कृष्णा राम मुळक,
(जिल्हा जालना, विभाग छ. संभाजीनगर), कार्तीक विजय फ रकटे (जिल्हा व विभाग
कोल्हापुर), मयुर सुखदेव जाधव (जिल्हा सातारा विभाग कोल्हापुर), आदित्य प्रशांत
भंगाळे ( जिल्हा व विभाग छ.संभाजीनगर), संजय पिन्टु गावडे (सांगली विभाग कोल्हापुर),
साई रमेश लव्हाट, अहमदनगर, पुणे, विरसिंग खेमजी पाडवी, धाराशिव लातुर, सुदर्शन
युवराज कामडी, नाशीक, विभाग नाशीक
मुली - कु.
मुग्धा वैभव विर, कु. मैथली अरूण पवार, कु. आस्ना शब्बीर शेख, जिल्हा धाराशिव,
विभाग लातुर, पायल विठ्ठल तामखडे, श्रावणी रामहरी तामखडे सांगली कोल्हापुर, कु.
वैष्णवी कृशांत जाधव, नवी मुबंई, मुबंई, कु. निलम पांडुरंग मोहंडकर, नाशीक विभाग ,
चैताली अवधुत वडेकर, कोल्हापुर, वैष्णवी बळीराम सोनटक्के, जालना, कु. धनश्री दशरथ
लव्हाळे, पुणे, कु. स्नेहा अनिल लामकाने, सोलापुर पुणे, मनस्वी भोजराज नेहारे, नागपुर,
कु. जयश्री लक्ष्मण हुडीद, सांगली, कोल्हापुर, प्रणीती महादेव जगदाळे, नवी मुबंई,
मुबंई, आर्या सुनील चोरमले, पुणे.
जिल्हाधिकारी
यांनी राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडुंसह सर्व खेळाडुंना शुभेच्छा
देवुन महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेल्या खेळाडुंना राष्ट्रीय स्पर्धेत
आपल्या राज्याचे नावलौकीक करावे व त्याही ठिकाणी विजयश्री खेचुन आणावी, अशी
अपेक्षा व्यक्त
केली.
प्रास्तावीक
जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले. क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे.
यांनी जालना जिल्ह्यमध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व शालेय स्पर्धेपैकी सदर शालेय
खो-खो स्पर्धेचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन झाल्याबाबत आपल्या मनोगतामध्ये नमुद केले.
मंचावर विशेष उपस्थितीत निवृत तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, डॉ. रफिक शेख
(सचिव जिल्हा खो खो असोसिएशन), दीपक सपकाळ (तांत्रिक समिती प्रमुख), निवड समिती
सदस्य प्रशांत पवार, श्रीमती मनीषा मानकर, विकास सुर्यवंशी, शेख चाँद पी.जे.
(जिल्हा क्रीडा संघटक तथा सचिव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन), प्र. गटशिक्षण अधिकारी
डॉ. भरत वानखेडे, प्रशांत नवगीरे (क्रीडा संघटक), प्रमोद खरात (क्रीडा प्रबोधिनी
प्रमुख), कु. प्रियंका येळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू), प्रकाश कुंडलकर
(मुख्याध्यापक जी. प. प्रशाला मुलांची जालना), क्रीडा संघटक विजय गाडेकर यांची
प्रमुख उपस्थिती होती.
तत्पुर्वी
अंतिम सामन्याची सुरूवात जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात
आली. संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट व निर्वीवाद पंचगिरी करणा-या पंचांचा सत्कार श्री.
सुर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन करण्यात आला.
स्पर्धा
यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली
क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे, शेख मोहम्मद, डॉ. रेखा परदेसी, सोपान शिंदे,
संतोष प्रसाद, हारुण खान, राहुल गायके, सचिन मोहीते, सचिन दोरखे, अमोल शिंदे,
मधुकर अंभोरे, क्रीडा प्रबोधिनीचे सर्व शिक्षक व खेळाडू तसेच नियुक्त केलेल्या
विविध समित्यांचे पदाधिकारी सर्वश्री देवा चित्राल, कैलास नाटकर, क्रीडा संघटक
परिश्रम घेतले.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment