Wednesday 1 November 2023

जालना जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबरला दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

 


 

जालना दि. 31 (जिमाका) :- अंबड तालुक्यातील मौजे अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासंदर्भात दि.25 ऑक्टोबर 2023 रोजीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अबकारी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार व मद्यविक्री  दि.2 व 3 नोव्हेंबर 2023 या दोन दिवशी संपुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment