Tuesday 7 November 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना दि. 7 (जिमाका) :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेस पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी महाडिबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, तसेच संबंधित महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पनन विहीत मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती करण्यात येत असते. ही योजना राबविण्यासाठी शासनाने महाडिबीटी पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दि.11 नोव्हेंबर 2023 पासून खुले करण्यात आले असून पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment