Tuesday 21 November 2023

5 व 6 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन

 


 

            जालना दि. 21 (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून दरवर्षी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या युवा महोत्सवाच्या निवडीसाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जालना जिल्हा  संकुलावर दि.5 व 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण युवक-युवतींनी, संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, युवक मंडळे, नामांकित कलाकार, संस्थांनी जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

            जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी आपले प्रवेश अर्ज विहीत नमुन्यात दि.3 डिसेंबर 2023 रोजी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत.  युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात समुह लोकनृत्यामध्ये 10 कलाकारांची संख्या व वेळ 15 मिनिटे राहील. वैयक्तिक सोलो लोकनृत्यामध्ये कलाकारांची संख्या 5 व वेळ 7 मिनिटे राहील. लोकगीतामध्ये कलाकारांची संख्या 10 व वेळ 7 मिनिटे राहील. वैयक्तिक सोलो लोकगीतामध्ये कलाकारांची संख्या 5 तर वेळ 7 मिनिटांचा असेल. कौशल्य विकास अंतर्गत कथा लेखनात सहभागींची संख्या 3 तर 1 हजार शब्द मर्यादा व वेळ 1 तास राहील. पोस्टर स्पर्धेसाठी सहभागींची संख्या 2 तर वेळ 1 तास 30 मिनिटांचा असेल. हिंदी व इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी सहभागींची संख्या 2 तर वेळ 3 मिनिटांचा राहील.  संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर स्पर्धेत सहभागींची संख्या 35 तर सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान यामध्ये सहभागींची संख्या 5 राहील. युवा कृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग आणि ॲग्रो प्रोडक्ट स्पर्धेसाठी सहभागींची संख्या  प्रत्येकी 7 अशी ठेवण्यात आलेली आहे. युवा महोत्सवातील स्पर्धेबाबत सुचना, नियम व अटी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी संतोष वाबळे (मो.7588169493) यांच्याशी संपर्क साधावा.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment