Thursday 23 November 2023

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 



 

 

      जालना, दि. 23 (जिमाका) : - कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),जालना अंतर्गत दिनांक   22 नोव्हेंबर 2023 रोजी कृषि विज्ञान केंद्र,खरपुडी, जालना येथे  कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जितेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले . सदर कार्यशाळेचे उदघाटन जितेंद्र शिंदे (प्रकल्प संचालक आत्मा, जालना व गहिनीनाथ कापसे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना) यांचे हस्ते  दिप प्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेचे प्रस्ताविक जितेंद्र शिंदे , प्रकल्प संचालक आत्मा,जालना यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे वाचन आणि संपूर्ण विस्तृत माहिती विषय विशेषज्ञ अंबादास खडसान यांनी दिली.

 

            सूत्रसंचालन धैर्यशील पाटील,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन राहुल चौधरी, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र,खरपुडी,जालना यांनी केले त्यांनी नैसर्गिक शेती च्या अनुषंगाने बायोडायनामिक शेती तंत्रज्ञान,जीवामृत, सीपीपी,जैविक किड रोधक निर्मिती,तरल खाद्य, दशपर्णी अर्क, कंपोस्ट, नाडेप,गांडूळ खत ई. ची निर्मिती प्रक्रिया व त्यांचा वापरा बाबतचे मार्गदर्शन केले. 

           ओमप्रकाश कोहिरे ,निवृत्त प्राचार्य कृषि महाविद्यालय खरपुडी, जालना यांनी सेंद्रिय शेती,एस.आर.टी. व झिरो टिलेज शेती बाबत सविस्तर माहिती दिली.  डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांचे रूपांतर शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये करण्याबाबत चे मार्गदर्शन धैर्यशील  पाटील,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आत्माराम मोरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. यावेळी आत्माचे जिल्ह्यातील सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषि विभाग सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीकांत देशपांडे , प्रकल्प उपसंचालक आत्मा यांनी आभर मानले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment