Monday 6 November 2023

बेरोजगारांसाठी 8 नोव्हेंबरला जागेवर निवड संधीचे आयोजन

 


 

जालना दि. 6 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुस-या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेरोजगारांसाठी बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन मॉडेल करिअर सेंटर जालना येथे करण्यात आले आहे. तरी बेरोजगारांनी  प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीमध्ये  सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, जगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांच्याकडून  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना   येथे दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी गौरी ऑग्रोटेक, प्रा. लि. गुंडेवाडी जालना यांची पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण अकाऊंटंट साठी 2 पदे, कोणतीही पदवीधर साठी सुपरवायझर/स्टोअर ऑफिसर/ मिल सुपरवायझर पदासाठी 6 पदे तसेच दहावी/ बारावी सुपरवायझर साठी 1 पदे आणि विक्रम टी प्रा लि.जालना यांची बी टेक (अन्न तंत्रद्यान) पदवीधर अनुभव असलेल्या साठी गुणवत्ता अधिकारी 2 पदे, (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण अकाऊंटंट साठी 2 पदे, तसेच पदवीधर उत्तीर्ण साठी डाटा एन्ट्री परेटरसाठी 2 पदे, अशी एकूण 15 रिक्त पदे  प्राप्त झालेली आहेत. उपस्थित नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड केली जाणार आहे.

              जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक  लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-9 जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा.  किमान दोन प्रतीत बायोडाटासह  फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून 8 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना   येथे उपस्थित रहावे. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment