Friday 24 November 2023

संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रविवार दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली.

संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायती, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात यावे.  संविधानाबाबत जननजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत संविधान दिन रॅली काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची उद्देशिका, मुलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्वाचे कलम ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावेत. शाळा, महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान या विषयावर निबंध, भित्तीपत्रक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने आयोजित करण्यात यावी. असे निर्देशही संबंधित विभागाला जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment