Tuesday 21 November 2023

जालना येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन

 


 

जालना दि. 21 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती-जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन             दि.1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जालना आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत निःशुल्क 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमांचे सविस्तर माहिती मिळण्याच्या दृष्टीने दि. 1  डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, (सभागृह) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, जालना व विभागीय अधिकारी डी.यु. थावरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना मो.९६८९६७३९४२, ९५७९२६४८६८ यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment