Friday 24 November 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिध्द

 


जालना, दि. 24 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या नियोजित विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

अंदाजित वेळापत्रकानूसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2024 अंतर्गत पुर्व परिक्षेसाठी जाहिरात जानेवारी 2024 मध्ये येवून दि.17 मार्च 2024 रोजी परीक्षा घेण्यात येईल तर निकाल मे 2024 मध्ये लावला जाईल. तसेच मुख्य परिक्षा दि.27 जुलै 2024 रोजी घेण्यात येवून निकाल ऑक्टोबर 2024 रोजी लावला जाईल. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा-2024 अंतर्गत जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये येवून पुर्व परीक्षा दि.16 जुन 2024 रोजी घेण्यात येवून निकाल ऑगस्ट 2024 मध्ये लावला जाईल. तर मुख्य परिक्षा दि.29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल जानेवारी 2025 मध्ये लावला जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत परीक्षा 26 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल जानेवारी 2025 मध्ये लावला जाईल.  महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत परीक्षा दि.17 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल फेब्रुवारी 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 अंतर्गत जाहिरात जानेवारी 2024 मध्ये येवून पुर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येवून निकाल जुलै 2024 मध्ये लावला जाईल. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.9 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी  सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.23 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल फेब्रुवारी 2025 मध्ये लावला जाईल. निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.1 डिसेंबर 2024 रोजी मुख्य परीक्षा दि.1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.14, 15 आणि 16 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.28 व 29 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत मुख्य परीक्षा दि.30 व 31 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येवून निकाल मार्च 2025 मध्ये लावला जाईल. असे उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment