Wednesday 3 May 2023

जालना येथील मे. वेद स्टिल्स ॲण्ड अलॉयज प्रा. लि. प्रस्तावित प्रकल्प पर्यावरणविषयक जाहीर सुनावणीसाठी संबंधितांना आक्षेप नोंदविण्याबाबत आवाहन

 


 

जालना, दि. 03 (जिमाका) :- मे. वेद स्टिल्स ॲण्ड अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड अतिरिक्त एमआयडीसी फेज-3 जालना या प्रस्तावित प्रकल्पामध्ये 3,96,000 टीपीए एमएस बिलेटसच्या उत्पादनाकरिता 2×40 टी प्रवर्तन भेट्टी व हॉट रोल्ड  प्रक्रियेद्वारे 3,88,080 टीपीए व रिहिटींग भट्टीद्वारे 1,06,920 टीपीए टीएमटी बार्स करिता रोलींग मिलचे उत्पादन पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी दि. 23 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता  आयोजित केली आहे. तरी या प्रकल्पाबाबत सुचना किंवा आक्षेप असल्यास सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2 अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना येथे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मे. वेद स्टिल्स ॲण्ड अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड अतिरिक्त एमआयडीसी फेज-3 जालना या प्रस्तावित प्रकल्पामध्ये 3,96,000 टीपीए एमएस बिलेटसच्या उत्पादनाकरिता 2×40 टी प्रवर्तन भेट्टी व हॉट रोल्ड  प्रक्रियेद्वारे 3,88,080 टीपीए व रिहिटींग भट्टीद्वारे 1,06,920 टीपीए टीएमटी बार्स करिता रोलींग मिलचे उत्पादन करणेबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी दि.23 मे 2023 रोजी सकाळी 11  वाजता मे. वेद स्टिल्स ॲण्ड अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड अतिरिक्त एमआयडीसी फेज-3 जालना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या  परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, या प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना या प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यानसुध्दा नोंदविता येतील. या प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, नगर परिषद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, तहसिल कार्यालय, तसेच जालना तालुक्यातील नागेवाडी, खादगाव, दावलवाडी, घानेवाडी, जवसगाव या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात, औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथील सायन  पूर्व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात, मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागात तसचे नागपूर येथील सिव्हील लाईन नवीन सचिवालय इमारतीतील पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयात संबंधित असणाऱ्या व्यक्ती कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील. असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment