Tuesday 16 May 2023

व्यवसाय शिक्षणाच्या प्रचारासाठी 17 मे रोजी “स्किल ऑन व्हील्स” व्हॅन जालन्यात जिल्हा परिषद येथे सकाळी 10 वाजेपासून प्रदर्शन

 


 

    जालना दि.16 (जिमाका) :-  नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना कृतीशील, व्यावसायिक आणि जीवन कौशल्ययुक्त शिक्षण  विद्यार्थ्यांना कसे देता येईल, याचा विचार केंद्र व राज्य शासन प्रामुख्याने करीत आहे. त्याअनुषंगाने लेंड-अ-हँड-इंडिया यांच्यामार्फत व्यवसाय शिक्षण प्रचारासाठी दि. 17 मे 2023 रोजी स्किल ऑन व्हील्स प्रदर्शन व्हॅन जिल्हा परीषद जालना येथे उपलब्ध होत आहे.

या स्किल ऑन व्हील्स प्रदर्शन व्हॅनद्वारे चालती फिरती प्रयोगशाळा म्हणुन विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत प्रवृत्त करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल, कृषी उद्यानिकी, आरोग्य यासह इतर व्यावसायिक जीवन कौशल्य शिक्षण कसे देता येईल. याचे जालना शहरात या सुसज्ज व्हॅनच्या माध्यमातुन प्रात्याक्षिकाद्वारे माहिती देण्यात येणर आहे.

            सदर स्किल ऑन व्हील्स सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत जिल्हा परिषद, जालना येथे उपलब्ध असणार आहे. तरी या व्यवसाय शिक्षण प्रदर्शनास विद्यार्थी, शिक्षक नागरीकांनी भेट देऊन व्यवसाय शिक्षण माहितीचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलाश दातखीळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                 -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment