Thursday 11 May 2023

महाज्योतीकडून मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

जालना, दि. 11 (जिमाका) :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था,  इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील 1 हजार 500 युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज  करावेत. तरी पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 28 मे 2023 पर्यंत ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षण इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन, अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण व वैद्यकीय अर्हता पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या 1 हजार 500 ठेवण्यात आली आहे.  अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. असे प्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment