Wednesday 3 May 2023

पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी 'हर घर नर्सरी' उपक्रमाद्वारे प्रत्येक कुटुंबाने व प्रशासकीय विभागांनी रोपांची निर्मिती करावी

 


     जालना, दि. 3(जिमाका) :- जिल्ह्यात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी या उद्देशाने हर घर नर्सरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान 50  रोपे तयार करावयाची आहेत.  या उपक्रमात लोकसहभाग वाढावा हा हेतू आहे. त्यामुळे वृक्षलागवड अभियानाला व्यापक स्वरुप प्राप्त होवू शकेल. तसेच शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाने 50 रोपे तयार केल्यास सन 2023 च्या पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची स्थानिक पातळीवर उपलब्धता होईल. सामाजिक दायित्व म्हणून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नर्सरी तयार करावी.  प्रत्येक शासकीय कार्यालयात 5 हजार रोपांची नर्सरी तयार करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

हर घर नर्सरी उपक्रमामध्ये शासनाच्या सर्व यंत्रणांना सहभागी करुन घेण्याबाबत कळविण्यात आले असून लोकसहभाग वाढविण्यासाठी शासकीय यंत्रणा काम करत आहेत. या उपक्रमात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कृतीशील सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. सामाजिक दायित्व म्हणून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी   नर्सरी तयार करावी.याकरीता प्रत्येक शासकीय कार्यालयात 5 हजार रोपांची नर्सरी तयार करावी. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड होईल याकरीता अशा रोपांची प्रधान्याने निर्मिती करण्याबाबत औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी कळविले आहे. तरी आपल्या कार्यालय परिसरात उपलब्ध जागेमध्ये प्रत्येक कार्यालयाने 5 हजार रोपांची निर्मिती करावी. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हर घर नर्सरी उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबाबदारी घ्यावी. जेणेकरुन वर्ष 2023  च्या पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोपांची स्थानिक पातळीवर सहज उपलब्धता होवून पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीबाबत चांगला संदेश जाईल. कार्यालयाने तयार केलेल्या नर्सरीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दि.14 व 28 तारखेला नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं)  जिल्हा परिषद जालना यांच्याकडे सादर करावा तर संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी अहवाल 15 व 30 तारखेस जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा. अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या आहेत.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment