Tuesday 9 May 2023

दृष्टिहीन बालकाच्या नातेवाईकांना आवाहन नाव-संदेश, वय-15 वर्षे



          जालना, दि. 9 (जिमाका) :-   कु. संदेश, जन्म दि. 03/12/2007 वय 15 वर्ष 4 महिने हे बालक दि. 9 जून 2021 रोजी बाल कल्याण समिती, जालना यांच्या आदेशाने श्री. गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालय गणेशनगर, जालना येथून शाम सुंदर बंदरमलाल राठी यांनी शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुना तहसील जवळ, जुना जालना येथे दाखल केले आहे. संदेश हा अनाथ असून तो एका डोळ्याने अंध देखील आहे. तो आधी रामकुंवर रमेशचंद्र बंग येथील बालगृहात राहत होता, परंतु ते बालगृह बंद झाल्यामुळे त्याला शाम सुंदर बंदरमलाल राठी यांच्या मार्फत शासकीय बालगृह, जालना येथे दाखल केले आहे. प्रवेशिताचे आई वडील व इतर नातेवाईक यांचा कोणताही प्रकारे शोध लागला नाही व यापैकी कोणीही त्याला भेटण्यास आले नाही. सध्या त्यांचे राहण्याचे ठिकाण माहित नसल्याने त्यांची गृहभेट/ एस.आय. आर. करता आले नाही.

     कु. संदेश याच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी निवेदन प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांच्या आत शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुना तहसील जवळ, जुना जालना येथे किंवा मो. 9404000405 या नंबरवर किंवा बाल कल्याण समिती, जालना किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना किंवा जालना रेल्वेस्टेशन यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.  

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment