Tuesday 9 May 2023

सापडलेल्या बालकाच्या नातेवाईकांना आवाहन नाव-सुनील, वय-13 वर्षे



      जालना, दि. 9 (जिमाका) :-   कु. सुनील हनीफ सय्यद, जन्म दि. 5 नोव्हेंबर 2009, वय 13 वर्ष 4 महिने हे बालक दि. 5 डिसेंबर 2016 रोजी बाल कल्याण समिती, जालना यांच्या आदेशाने शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुन्या तहसील जवळ, जुना जालना येथे दाखल झालेला आहे. सदर बालकाच्या पालकांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. ते रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे मुलाशी चर्चा केली असता कळाले. आई - वडील दोघेही दारु- गांज्या, व्हाईटनर पिण्याच्या सवयीचे असून मुलाला त्यांनी सोडून दिल्याचे वाटते. त्यांचे इतर कोणीही नातेवाईक मिळून आले नाही. सध्या त्यांचे राहण्याचे ठिकाण माहित नसल्याने त्यांची गृहभेट/ एस.आय.आर. करता आले नाही.

    कु. सुनील हनीफ सय्यद यांच्या नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी निवेदन प्रसिध्द झाल्यापासुन 30 दिवसांच्या आत शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, शंकर नगर जुना तहसील जवळ, जुना जालना येथे 9404000405 या नंबरवर किंवा बाल कल्याण समिती, जालना किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना किंवा जालना रेल्वेस्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.  

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment