Wednesday 3 May 2023

उन्हाळी खेळ प्रशिक्षण शिबीराचे आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर डांगे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 


 

जालना, दि. 03 (जिमाका) :- जिल्ह्यातील खेळांचा प्राथमिक कौशल्य विकास व नवीन विद्यार्थी खेळाडूंना विविध खेळाविषयी  आवड निर्माण होण्यासाठी दि. 3 ते 12 मे 2023 या कालावधीत मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात फुटबॉल, खो-खो, तलवारबाजी, योगासन, कबड्डी, तायक्वांदो, टेनिक्वाईट, नेटबॉल, सेपाक टकरा, स्केटींग, बॉक्सींग, आर्चरी, सॉफ्टबॉल व बेसबॉल इत्यादी खेळाच्या प्रशिक्षण शिबीरांचे उद्घाटन आज बुधवार दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, योगगुरू डॉ. चेतनकुमार भागवत, रेखा परदेशी, देवानंद चित्राल, विजय गाडेकर, रविंद्र ढगे, श्री.जहागिरदार, मयुर पिवळ, विक्रांत चिलकलवार, ईस्माईल शेख इत्यादी खेळांच्या क्रीडा संघटक व प्रशिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिनस्त़ क्रीडा व युवक सेवा विभाग औरंगाबाद यांच्या अंतर्गत जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे, गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय खेळनिहाय व शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन दरवर्षी प्रमाणे दि. 3 ते 12 मे 2023 या कालावधीत सकाळी 6.30 ते 9 आणि सांयकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर डांगे यांनी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देऊन खेळाचा सराव करावा व आपल्या जिल्ह्याचे राज्यासह राष्ट्रीयस्तरावर नाव लौकिक करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे सांगितले. प्रमुख पाहुणे योगगुरू डॉ. चेतनकुमार भागवत यांनी व आयुर्वेद मार्गदर्शक यांनी खेळाडूंना योगाच्या माध्यमातून एकाग्रता व मेडीटेशन, आत्मचिंतन करण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच श्री देवानंद चित्राल यांनी योग अभ्यास सत्र घेऊन खेळाडूमध्ये नवचैतन्य निर्माण केले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले. सुत्रसंचालन संतोष वाबळे यांनी तर आभार रेखा परदेशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी नवनाथ गायकवाड,  हारूण खान आदिंनी परिश्रम घेतले.  असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment