Tuesday 2 May 2023

 

सामाजिक न्याय समता पर्वनिमित्त 223

 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

 

जालना, दि. 2 (जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय समता पर्व म्हणून साजरा करण्यात आला. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी  समिती जालना या कार्यालयाने एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत एकुण 7 हजार 601अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यातआली तर शुक्रवार दि.28 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा जाती  प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 223 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अशी माहिती उपायुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्या वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

            अपर जिल्हाधिकारी महेंद्र हरपाळकर म्हणाले की,  अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करुन जात वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करावी. प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे दाखल करुन समितीपासून कोणतीही माहिती व बाब लपवू नये. योग्य व खरी कागदपत्रे प्रस्तावासोबत दाखल केल्यास अर्जदारास 15 दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे संबंधितांनी विहीत वेळेपूर्वी प्रस्ताव दाखल करण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदस्य सचिव प्रदिप भोगले यांनी केले. सुत्रसंचालन विधी अधिकारी श्वेता कांबळे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक गौतम धनेश्वर यांनी मानले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment