Tuesday 17 October 2023

नवरात्र उत्सवामुळे वाहतुकीमार्गात बदल

 


नवरात्र उत्सवामुळे वाहतुकीमार्गात बदल

     जालना दि. 17 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्सोदरी देवी मंदीर येथे दि. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत पाचवी, सहावी तसेच सातव्या माळेच्या दिवशी दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदीरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.  जालन्याकडून अंबडमार्गे बीडकडे जाणारी वाहने व बीडकडुन अंबड मार्गे जालन्याकडे येणा-या अवजड वाहनांना दि.19 ऑक्टोबर रोजीच्या सकाळी 4.00 वाजेपासुन दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

    बीडकडुन अंबडमार्गे जालन्याकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाच्या खालून, पाचोड, अंबड, गोलापांगरी मार्गे जालन्याकडे जातील) तसेच जालन्याकडून अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

     घनसावंगीकडून अंबडमार्गे जालन्याकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी,गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालन्याकडे जातील) जालन्याकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

      घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपूरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री यामार्गे शहागडकडे जातील) शहागडकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

     वरील मार्गाचे अवजड वाहतुकीमध्ये दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 4.00 वाजेपासुन दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment