Wednesday 25 October 2023

ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे जालना येथे 27 ऑक्टोबर रोजी विशेष व्याख्यान

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :-  जालना ज्येष्ठ नागरिक मंच  व उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक मंच तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी          सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या ठिकाणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 या मेळाव्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, उपाययोजना व आरोग्य’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.  तरी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जालना ज्येष्ठ नागरिक मंच, उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक मंच, जालनाचे पदाधिकारी ज्ञानदेव पायगव्हाणे, मोहन राठोड, धर्मा खिल्लारे व जालना समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment