Wednesday 25 October 2023

मुलगा दिसून आल्यास संपर्क साधण्याचे पोलिस विभागाचे आवाहन


 


जालना दि. 25 (जिमाका) :- जालना तालुक्यातील धारकल्याण येथील विनायक महाराज मंदीर जवळुन दि. 22 ऑक्टोबर 20223 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विनायक बळीराम ढोबळे वय 5 वर्षे या मुलाला पळवून नेण्यात आले आहे. मुलाच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅंन्ट,  कंबरेला लाल रंगाचा करदुडा, बांधा मजबुत असून रंग सावळा असे वर्णन आहे. त्याला भाषा मराठी अवगत आहे.  मुलाला  विनायक महाराज मंदीर जवळ धारकल्याण ता.जि. जालना येथुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी अमिष दाखवुन फुस लावुन पळवून नेले आहे. तरी छायाचित्रातील मुलगा दिसून आल्यास अथवा काही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तालुका जालना (मो.८९७५०२३१००), तपास अधिकारी तथा सहा.पोलीस निरीक्षक सावळे (मो. ९६०४९११५०५) यांच्याशी  संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment