Thursday 12 October 2023

दिपावली उत्सवानिमित्त फटाका विक्री परवान्यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :- दिपावली सणानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाका विक्री होत असते. विस्फोटक नियम 2008 मधील कलम 84 अन्वये सदरील तात्पुरता फटाका विक्री करण्याचे परवाने अपर जिल्हादंडाधिकारी या कार्यालयामार्फत निर्गमित होत असतात. तरी तात्पुरता फटाका विक्री नुतनीकरण व नवीन तात्पुरता फटाका परवाने अर्ज दि.23 ऑक्टोबर 2023 पर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असतात. त्याकरिता सदरील तात्पुरते परवाने विहीत मुदतीत देणे सुलभ व्हावे यासाठी यावर्षी फटाका परवाना देण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व तात्पुरता फटाका विक्री परवाने वेळेत देण्यात येतील. फटाका विक्री परवान्यासाठी  विहीत नमुन्यातील अर्ज, परवाना धारकाचा फोटो,  पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र/ फोटो असलेला कुठलाही पुरावा,  महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोक-या यांवरील कर अधिनियम 1975 नुसार व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडील नादेय प्रमाणपत्र,  आयुक्त तथा प्रशासक जालना महानगर पालीका/मुख्याधिकारी नगर परिषद/नगरपंचायत/ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचे कडील स्थळ दर्शक नकाशासह नाहरकत प्रमाणपत्र,  नवीन परवाना धारकांसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्रासह नाहरकत (कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित पो.स्टे.ला या कार्यालया मार्फत पत्र देण्यात येईल),  सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे परवाना शुल्का नुतनीकरण शुल्क शासन जमा करण्यासाठी शासकीय चलन देण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment