Tuesday 10 October 2023

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 833 प्रकरणे निकाली;

 


9 प्रकरणात जोडप्यांनी सामंजस्यातून जोडीने संसार करण्याचा घेतला निर्णय

 

            जालना दि. 10 (जिमाका) :-   राष्ट्रीय विधी सेवा यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण, दिल्ली प्रकरणे, तसेच धनादेश अनादरण संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपूर्व वस. मूली प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्रकरणे, बी.एस.एन.एल.ची दावा दाखल पूर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. व तशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. सदरच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकुण 833 प्रकरणे निकाली निघाली. तर प्रकरणात तडजोडीअंती रू. 12,32,11,118/- एवढी रक्कम जमा झाली. अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्याच्या मुख्यालयी लोकअदालतीसाठी 6 पॅनल ठेवण्यात आले. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले. कौटुंबिक न्यायालय, जालना येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण प्रकरणात तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात काढण्यात आली. त्यामधील 9 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवुन घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्षकाराच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदरचे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाली. पॅनल सदस्य म्हणुन मान्यवर विधीज्ञांनी आणि सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष वर्षा मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए. जी. जोशी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, तसेच  सर्व न्यायाधीश यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेउन लोकअदालत यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment