Wednesday 18 October 2023

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत ऑनलाईन डिजीटल मार्केटींगचे प्रशिक्षण

 


 

          जालना दि. 18 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी ) जालना येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 25 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत:चा स्वंयरोजगार निर्माण करावा. या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.या प्रशिक्षणामधुन प्रशिक्षणार्थी स्वंयरोजगाराबाबत उपलब्ध  डिजिटल मार्केटिंग बेसिक, करिअर आणि व्यवसायसंधी, वेबसाईड ब्लॉग, एससीओ, गुगल ॲडस फेसबुक ॲडस, इन्स्टाग्राम, युट्युब ॲण्ड व्हिडिओ मार्केटींग, इमेल मार्केटिंग, कन्टेन्ट मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून पैसे कसे कमविण्यात येतात याबाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

        कार्यक्रमाकरीता प्रशिक्षणार्थी हा किमान सातवी उत्तीर्ण  तसेच  18 ते 50 वयोगटातील असावा. तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्रबळ इच्छा असावी. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरिता 4 ऑक्टोबरपुर्वी कार्यक्रम समन्वयक अमित देशमुख (मो.9689552233) येथे  किंवा  विनोद तुपे, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम.सी.ई.डी.), जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं.पी-7. अतिरिक्त औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगर रोड, जालना (दु. क्र. 02482-220592) येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

                                                          -*-*-*-*-  

No comments:

Post a Comment