Thursday 12 October 2023

14 ऑक्टोबर रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

     जालना दि. 12 (जिमाका) :-    मनोज जरांगे पाटील रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर यांनी दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा समाजातील लोकांसोबत संबोधन सभेचे आयोजन केलेले आहे. मराठा समाजातील संबोधन सभेमध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र विभागातुन सभेसाठी मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता असून सदर सभा ही मौजे आंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील 100 एकर जागेवर धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळ होणार असून सभेसाठी अनेक वाहने येणार आहे.

      सदर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून वाहनांच्या रहदारीमुळे अपघात होऊ शकतो त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.  

    पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये छत्रपती संभाजीनगर ते बीड या राष्ट्रीय महामार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत)खालील सर्व प्रकारच्या वाहतुकीस खालील मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे  यांनी जारी केले आहेत.

 

     जालना-अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग जालना-अंबड/घनसावंगी – आष्टी- माजलगांव मार्गे बीडकडे जाईल.   छत्रपती संभाजीनगर –पाचोड-वडीगोद्री –शहागड मार्गे बीडला जाणरी वाहतुक पर्यायी मार्ग छत्रपती   संभाजीनगर –पैठण उमापूर फाटा मार्गे बीडकडे जाईल. बीड- शहागड-वडीगोद्री  मार्गे जालन्याकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड – माजलगाव-आष्टी –घनसावंगी/अंबड मार्गे जालन्याकडे जाईल.  बीड-शहागड-वडीगोद्री –पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड- उमापुर फाटा –पैठण मार्ग छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.

      वरील मार्गाची सर्व वाहतुक दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत) बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांना याची नोंद घेण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

 

                                                                    -*-*-*-*-*-         

 

 

No comments:

Post a Comment