Thursday 12 October 2023

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुणालय जालना व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त रागोंळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्यासह महाविद्यालयातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.     

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य मानसिक आरोग्य हा जागतिक मानवी हक्क असे आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके, अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन शाह, मनोविकृती चिकित्सक डॉ. नितिन पवार, आणि डॉ. सुरज सेठीया, शासकिय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदिप गोरे यांच्यासह मानसिक आरोग्य विभागातील किरण निर्मळ, त्रिशिला पाईकराव, शितल सिनगारे, सुलोचना पडघण, अंकित गिरमकार, प्रदीप शिंदे उपस्थित होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment