Tuesday 3 October 2023

जालना येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा

 


जालना, दि.  3 (जिमाका) :- मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4  वाजेपर्यंत  पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सुवर्ण संधीचा रोजगार  इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.  विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा,  शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायांकित प्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहून  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                                  

रोजगार मेळाव्यात करिअर विषयक  मार्गदर्शन करण्यात येणार असून दहावी /बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/ बी.एस सी./एम.कॉम/बी.फॉर्म/ डिप्लोमा व बी.ई./ डिप्लोमा  ॲग्री/बी.एस सी. ॲग्री /एम.एस.सी. ॲग्री /एम.बी.ए/एम.बी.ए./एम.एस.डब्ल्यू. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक यांचेसाठी एकूण  953  रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 12  कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.   या मेळाव्यात शासनामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय संस्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार  आहे. तसेच  व्यवसाय इच्छुकांकरिता स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून  योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे.                

रोजगार मेळाव्यामध्ये एन.आर.बी. बेरिंग लि. जालना यांची 30 पदे,  धूत ट्रान्समिशन प्रा. लि. शेंद्रा, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांची 300 पदे, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर यांची 200 पदे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि. वाळूज छत्रपती संभाजीनगर) यांची 21 पदे, क्यूस कॉर्पोरेशन लि. पुणे  (फोर्स मोटर्स लि, आकुर्डी, पुणे / टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे) यांची 200 पदे,  महिको  प्रा. लि. एमआयडीसी, जालना यांची 4 पदे,  ओम  साई मॅन पॉवर  सर्विस प्रा. लि. वाळुज एमआयडीसी,  छत्रपती संभाजीनगर यांची  50 पदे , फुलब्री टेक्स कॉम प्रा. लिमिटेड, जालना यांची 70 पदे,  कॉपी व्हिजन   इनफोर्समेंन्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड जालना यांची  21 पदे, एल. जी. बी . कंपनी जालना यांची 20 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स प्रा. लि. छत्रपती  संभाजीनगर यांची 28 पदे  अशी एकूण 953  रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असून पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment