Thursday 5 October 2023

रोजगार मेळाव्यातून 242 उमेदवारांची निवड

 


 

      जालना दि. 5 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.4 ऑक्टोंबर, 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कपन्यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. मेळाव्यात 569 पूरुष व 100  स्त्री  अशा एकुण 669 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. 425 उमेदवारानी विविध उद्योजकाकडे मुलाखती दिल्या, त्यापैकी 242 उमेदवारांची विविध आस्थापनांनी प्राथमिक निवड करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यामार्फत दि.4 ऑक्टोंबर, 2023 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना येथे सेवा पंधरवाडा निमित्त  "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन प्राचार्य डॉ.प्रविणकुमार उखळीकर यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले,  सूत्रसंचालन  करुन आभार कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.

 रोजगार मेळाव्यात एन आर.बी. बियरिंग प्रा. लिमिटेड जालना - 35, एल.जी.बी. बालकृष्णन र्बोस  प्रा.लि.  जालना- 10, महिको  प्रा. लि. जालना-3, कॉपी व्हिजन  इनफोर्समेंन्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड जालना- 18, गौरी ॲग्रोटेक प्रा. लि. जालना- 40, फुलंब्री टेक्स कॉम प्रा. लिमिटेड जालना- 16, क्यस कॉर्पोरेशन लि. पुणे  15, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि.  शेंद्रा, छ. संभाजीनगर- 45, ओम  साई मॅन पॉवर  सर्विस प्रा. लि. वाळुज, छ. संभाजीनगर- 24, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर- 13, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर- 9 आणि नवभारत फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड छ. संभाजीनगर- 14 याप्रमाणे उमेदवारांची  प्राथमिक निवड केली. तर मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध महामंडळाकडे 318 उमेदवारांनी भेट दिली.  रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment