Monday 28 June 2021

हातवण लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम गतीने पुर्ण करा - पालकमंत्री राजेश टोपे

 



            जालना, दि. 28 - जालना तालुक्यातील हातवण लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी 297 कोटी 39 लक्ष  रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला असुन या प्रकल्पाचे काम गतीने पुर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            हातवण प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, विशेष भु-संपादन अधिकारी गणेश निऱ्हाळी,लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, हातवण गावचे सरपंच अहेमद खॉ पठाण, महेबुब आदींची उपस्थिती होती.

            जालना तालुक्यातील हातवण प्रकल्प हा विशेष बाब म्हणून मंत्री मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन मंजुर करुन घेण्यात आला असुन यासाठी 297 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधीही मंजुर करुन घेण्यात आला आहे.  या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भु-संपादनाचा परिपुर्ण प्रस्ताव भु-संपादन विभागाकडे विनाविलंब सादर करण्यात यावा.  तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण, जमीनीची मोजणी यासह ईतर बाबी प्राधान्याने पुर्ण करत या प्रकलपात मौजे. बापकळ हे गाव बाधित होत असल्याने गावाच्या पुनर्वसनासंदर्भात आवश्यक ती कार्यवाहीही तातडीने करण्याबरोबरच या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी समन्वय ठेवत चोखपणे  पार पाडण्याच्या सुचनाही   यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

            या प्रकल्पाची साठवण क्षमता 15.03 दलघमी एवढी असुन यामुळे 714 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच 24 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 

*******

 

 

No comments:

Post a Comment