Thursday 10 March 2022

दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची लोककलेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात जनजागृती

 




               

दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची

लोककलेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात योजना व विकास कामाची जनजागृती

 

       जालना, दि. 10 (जिमाका) :-  राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून व्यापक योजना व विकास कामांची जनजागृती करण्यात येत आहे. आज दि. 10 मार्च रोजी जालना, घनसावंगी व बदनापूर तालुक्यामध्ये कलापथकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. 

ईश्वरसेवा लोककला ग्रुप पथकाने घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी, कुंभारपिंपळगाव व जांबसमर्थ या गावांमध्ये, शाहीर विक्रम खरात कलापथक मंडळाने बदनापुर राजेवाडी, सेलगाव व दाभाडी या गावांमध्ये तर शिवसम्राट सोशल ग्रुपने जालना तालुक्यातील पीरकल्याण, बाजीउम्रद,जामवाडी व नेर गावांमध्ये लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती सरळ व सोप्या भाषेत नागरिकांना दिली.  नागरिकांनीही या कलाथपकांना भरभरुन दाद दिली. 

जालना जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावात हा लोक जागर होईल. शासनाच्या योजना अत्यंत सोप्या भाषेत लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून पोहचतील. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांनी ह्या कला पथकाचा जागर 15 मार्च पर्यंत गावा -गावात ठेवला आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment