Monday 7 March 2022

कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या जनजागृतीसाठी चित्ररथाद्वारे विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

 



 

            जालना दि.7 (जिमाका):- जालना जिल्ह्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आज (7 मार्च) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हिरवी झेंडी दाखवुन व फित कापुन जनजागृतीच्या विशेष मोहिमेचा शुभारंभ केला.

            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी श्रीमती जयश्री भुसारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आदींची उपस्थिती होती.

            जालना जिल्ह्याच्या आठ तालुक्यांमध्ये हा चित्ररथ फिरणार असुन कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करणार आहे.  या चित्ररथामध्ये कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 बाबींचे पालन,लसीकरण सर्व घरांचे, संरक्षण जालन्यातील प्रत्येक कुटूंबांचे, लसीकरण केल्यानंतर आवश्यक असणाऱ्या बाबी, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण, कोरोना व्हायरसची लक्षणे आदी संदेश या चित्ररथावर प्रसारित करण्यात आले आहेत. 

            जालना जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी हा चित्ररथ अत्यंत उपयुक्त ठरणार असुन ज्या भागात लसीकरण कमी झालेले आहे अशा ठिकाणी प्राधान्याने या चित्ररथाच्या माध्यमातुन जनजागृती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केल्या.

********

No comments:

Post a Comment