Tuesday 8 March 2022

शासकीय ग्रंथालयात महिला दिन ग्रंथ प्रदर्शनीने साजरा

 




          जालना दि.8 (जिमाका) :- जालना - येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात महिला दिनी थोर,कर्तबगार, लढवय्या व यशस्वी महिलांविषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा विद्यार्थीनी स्मिता पगारे,माया जानकर, संगीता मुंढे व ऋतुजा नवले या चौघींच्या हस्ते करण्यात आले.

          याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे,शंकर पवार, शरद हिवाळे,वैभव जोशी,ऋषिकेश झुंजकर यांच्यासह ईतर वाचक उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment