Tuesday 8 March 2022

दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची; लोककलेच्या माध्यमातून उद्यापासून होणार जागर

 


 

      जालना दि.8 (जिमाका) :- राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांममधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

    दि. 9 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 8 तालुक्यांत लोककलेच्या माध्यमातून ही मोहिम राबविली जाणार आहे.   जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, आठवडे बाजार याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.

नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment