Thursday 10 March 2022

भोकरदन व अंबड तालुक्यात लोकसहभागातून पाणंद रस्ते कामाचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ




        जालना, दि. 10 (जिमाका) : भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महाराजस्व अभियानातंर्गत लोकसहभागातून अडीच किलोमीटर पाणंद रस्ते कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते आज झाला. तसेच  अंबड तालुक्यातील पानेगाव येथेही लोकसहभागातून पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दि. 9 मार्च रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आला.

            उमरखेड येथील कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे,नायब तहसिलदार श्री दांडगे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यावेळी म्हणाले कीपावसाळयामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते अभावी मोठी अडचण निर्माण होतेत्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 250 किलोमीटर पाणंद रस्ता लोकसहभागातून तयार करण्याचा मानस आहे. या रस्ते कामासाठी ग्रामस्थानी पुढे येण्याची गरज आहेरस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडून जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगत पाणंद रस्ता झाल्यास शेतकऱ्यांची मोठी सोय होणार असल्याने ग्रामस्थानी या कामात पुढाकार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी केले.

पानेगाव येथे पाणंद रस्ते कामाचा शुभारंभ

            अंबड तालुक्यातील मौजे पानेगाव येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दि. 9 मार्च रोजी भेट देऊन त्या ठिकाणच्या चार किलोमीटर अंतर असलेल्या पानेगाव ते कातखेडा रास्ता, पानेगाव दैठना-मुंढे वस्ती रास्ता, पानेगाव दहिपुरी रस्ता या लोकसहभागातून तयार करण्यात येणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले.

            यावेळी अंबडचे तहसिलदार विद्याचरण कडवकर, मंडळ अधिकारी रखमाजी घनवट, तलाठी ईश्वर पावसे, बांधकाम विभाग उप अभियंता श्री. जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहूल शेळके, गावचे सरपंच गजानन सानप, केशव आवाने, किसन लेकुरवाळे, विठ्ठल गायकवाड, बळीभाऊ दिडपोळे, मंजबा मुंढे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

            गावकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले की, गावामध्ये असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्याबरोबरच लोकसहभागातून अधिकाधिक पाणंद रस्त्याची कामे हाती घेण्यात यावीतनाला खोलीकरणाची कामेही करण्यात यावीतपावसाळयापुर्वी पाझर तलावातील गाळ काढल्यास त्याचा फायदा गावाला मोठ्या प्रमाणात होणार आहेया कामांबाबत काही प्रस्ताव असतील तर ती प्राधान्याने पाठविण्याचे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.

*******

No comments:

Post a Comment