Friday 26 October 2018

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न



            जालना, दि. 26 – जिल्हा दक्षता समितीची बैठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
            यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, जिल्‍हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव, दक्षता समिती सदस्यांन श्रीमती कमल जवाहरलाल तुल्‍ले, श्रीमती जिजाबाई अकाजी जाधव,कचरु रगडे, गोविंद पंडीत, बी.डी. पवार, शिवाजी खंदारे, रामराव लावणीकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जालना जिल्ह्यात ई-पॉस मशिनच्या माध्यमातुन धान्य वाटप करण्यात येत असल्यामुळे या धान्यात होणाऱ्या काळाबाजाराला आळा बसला आहे.  गोदामातून धान्य उचलत असताना वजनामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी येत असुन स्वस्तधान्य दुकानदारांनी धान्य घेताना ते मोजुन घेण्याचे आवाहन करत प्रत्येक शासकीय गोदामाच्या परिसरात सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावेत.  तसेच पाच वर्षे एकाच गोदामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे निर्देश देत अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची जिल्ह्यातील सर्कलनिहाय तपासणी करण्याबरोबरच नवीन कार्डधारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्य वाटवाचा तालुकानिहाय अहवाल मागविण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केल्या.
            यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह उपस्थित अशासकीय सदस्यांनी धान्य वितरणाबाबत असलेल्या तक्रारी तसेच वितरणामध्ये सुलभता येण्यासाठी उपयुक्त अशा सुचना मांडल्या.
*******






No comments:

Post a Comment