Monday 22 October 2018

मौजे जांबसमर्थ येथे 4 कोटी 66 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 22 - जिल्ह्यात पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव आहे.  रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेले पर्यटनक्षेत्र जिल्ह्यात विकसित करण्यासाठी आपण  प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीदिली. 
घनसावंगी तालुक्यातील मौजे जांब समर्थ येथे पर्यटन विकास 4 कोटी 66 लक्ष रुपये किंमतीच्या संग्रहालय ईमारत व परिसराच्या विविध विकास तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गतच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, ह.भ.प. रमेश वाघ महाराज, श्रीकृष्णपुरी महाराज, गणेशानंद महाराज, मुकूंद गोरे, विनायकराव देहडकर, सुनिल तांगडे, श्रीमती लता तांगडे, विलास तांगडे, अंकुशराव बोबडे, देवनाथ जाधव, संजय तौर, सर्जेराव जाधव, ज्ञानेश्वर शेजुळ, प्रकाश तांगडे, बन्सीधर तांगडे, विजय तांगडे, आदींची उपस्थिती होती. 
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करत असताना तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळांचाही विकास करणे गरजेचे आहे. समर्थ रामदास स्वामींनी सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले.  धर्मसत्ता पाठीशी असल्याशिवाय राजसत्ता चालत नसल्याचे सांगत या परिसराच्या विकासासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन समर्थरामदास महाराजांच्या हस्ताक्षरातील  दुर्मिळ लेख, वस्तुसामग्री, श्लोक, ग्रंथ तसेच इतर दुर्मिळ अशा वस्तुंसाठी संग्रहालयाची ईमारत उभारण्यात येणार आहे. या माध्यमातुन हा अनमोल असा ठेवा सर्वसामान्यांनाबरोबरच पुढील पिढीस पहावयास मिळणार असुन  या माध्यमातुन एक ऊर्जा सर्वांना प्राप्त होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
घनसावंगी भागाचाही संपूर्ण विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, या भागातील रस्यांण्ची अत्यंत वाईट आहे.  पाथरी-घनसावंगी-अंबड-पाचोड-पैठण या रस्या्णच्या कामांसाठी 271 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या रस्यांगच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.  या रस्यािधमुळे परिसरातील अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्यांीाच्या कामांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच उकडगाव, राजाटाकळी या गावच्या रस्यांगचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे.  या रस्यास्च्या कामासाठीही आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे.  त्याचबरोबरच मतदासंघातील 92 नवीन गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला असुन यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असुन घनसांवगी तालुक्यातील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी या भागासाठीही वॉटरग्रीड योजना राबविण्यात येणार असुन यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी ठराव सादर करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले. 
जिल्ह्यातील रस्ते विकासावर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असून जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 
शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सातत्याने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशिल असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आजपर्यंत 1 लाख 40 हजार 162 शेतकऱ्यांच्या खात्यात 704 कोटी 79 लक्ष रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 1लक्ष 39 हजार 927 शेतकऱ्यांना 88 कोटी 4 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाअसुन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी शासनाने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  त्यापेक्ी 183 कोटी रुपये विविध बँकेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असुन पीकविम्यापोटी जिल्ह्यातील 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 81 लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला असल्याचीही माहिती पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, रमेश महाराज वाघ, श्रीकृष्णपुरी महाराज, गणेशानंद महाराज आदींचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास तांगडे यांनी केले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, तसेच पंचक्रोशितील ग्रामस्थ, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
*******




No comments:

Post a Comment