Thursday 20 April 2023

जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन अंबड उपजिल्हा रुग्णालयाजवळ एक दिवसीय बाळ सापडले; पालक म्हणून दावा सिध्द करण्यासाठी संपर्क साधावा

 


 

जालना, दि. 20 (जिमाका) :- जिल्ह्यातील अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर काटेरी झुडूपात दि.1 एप्रिल 2023 रोजी   सकाळी 7.30 वाजता एक दिवसीय पुरुष जातीचे नवजात बाळ अज्ञात व्यतीने सोडून निघून गेले.

या बालकास मारोती शिंदे नामक व्यक्तीने जवळ घेवून त्या बाळाच्या पालकांचा आजूबाजूला शोध घेतला पण कुणीही आढळून आले नाही. अज्ञात व्यक्तीविरुध्द अंबड पोलिस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला असून बालकास पुढील उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना येथे दाखल करण्यात आले होते.  उपचार पुर्ण झाल्यावर बाल कल्याण समिती, जालना यांनी शहरात शिशुगृह नसल्यामुळे त्या बालकास बाल कल्याण समिती छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत केले. या बाळाला काळजी व संरक्षणाची गरज असल्यामुळे त्या बालकास बाल कल्याण समिती छत्रपती संभाजीनगर यांनी दि.6  एप्रिल 2023 रोजी आदेश देवून साकार संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेशित केले. बालकाच्या नैसर्गिक माता-पिता, नातेवाईकांचा शोध लागण्यासाठी पोलिस स्टेशन अंबड येथे एफआयआर दाखल केलेला आहे.

तरी या बालकाची सांभाळ करण्याची इच्छा असल्यास त्याच्या नैसर्गिक पालकांनी किंवा नातेवाईकांनी 30 दिवसाच्या आत साकार संस्था, अजमेरा कॉम्पलेक्स, प्लॉट नं.177 ज्योती नगर, छत्रपती संभाजीनगर, दुरध्वनी क्रमांक 0240-2347099 मोबा.9673101760  किंवा बाल कल्याण समिती , जालना किंवा बाल कल्याण समिती संभाजीनगर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जालना किंवा चाईल्ड लाईन 1098 किंवा पोलिस स्टेशन अंबड यांच्याशी संपर्क करुन पालक म्हणून आपला दावा सिध्द करावा. अन्यथा साकार संस्थेतर्फे या बालकाचे दत्तक विधानाद्वारे कायदेशीर पुनर्वसन करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment