Monday 17 April 2023

डाक जीवन विमा एजंटासाठी 28 एप्रिल रोजी थेट मुलाखतीचे आयोजन

 


 

जालना, दि. 17 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर डाक विभागात डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणार आहेत.  तरी इच्छकांनी अधिक्षक डाकघर, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर  या कार्यालयात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती, आधारकार्ड व पॅनकार्ड, दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह विहीत नमुन्यातील अर्जासह शुक्रवार दि.28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

पात्रतेसाठभ्‍ उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण अथवा केंद्र किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असावा. या पदासाठी सुशिक्षीत बेरोजगार,निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार करणारे पात्र आहेत. उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल, व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक आहेत.  निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक असून ती राष्ट्रीय बचत  पत्र किंवा किसान विकास  पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल जो आयआरडीएची परवाना परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरित केला जाईल. नियुक्ती लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल. असेही प्रतिसध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment