जालना दि. 25 (जिमाका) :- जिल्हास्तरीय
लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्याचे शासनाच्या सामान्य प्रशासन
विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश दिलेले आहेत. परंतू एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी
म्हणजेच 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यानंतर येणाऱ्या
कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन म्हणून पाळण्यात यावा असे निर्देश आहेत. तरी जालना येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवार दि.2 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंतच्या
कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी
संगिता सानप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित
तालुक्यांतील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व
सदर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही
कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यत दोन
प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला
नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी
अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन
सुचीत केलेले आहे. कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट
प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत
आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय
लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी
दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागद पत्रासह अर्ज केले असतील
त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार
अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज
करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्यात अर्ज https:jalna.nic.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment