Wednesday 5 April 2023

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक जालना दि. 5 (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनूसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी कार्यालये ज्यामध्ये 25 व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी मार्च-2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर-1 विवरणपत्र रविवार दि. 30 एप्रिल 2023 पुर्वी संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक संस्था, जिल्हा परिषद/पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय,कारखाने यांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 माहे मार्च-2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (30 एप्रिल 2023 पर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची मार्च -2023 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 रविवार दि.30 एप्रिल 2023 पुर्वी सादर करावेत. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ ओपन करुन, एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई- आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टी वगळुन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या (02482) 299033 या दुरध्वनीवर संपर्क साधावा. याकामी कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment