Monday 10 April 2023

18 एप्रिल रोजी पेंशन अदालत

 


 

जालना, दि. 10(जिमाका) :- औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आस्थापना यांनी दिलेल्या निर्देशानूसार पेंशन अदालत घेवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत सुचित केले आहे. त्यानूसार पेंशन अदालत मंगळवार दि.18 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता जालना जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पेंशन अदालतीसाठी संबंधितांनी प्रलंबित सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे. असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment