Monday 3 April 2023

जिल्ह्यात 1 एप्रिल ते 1 मे कालावधीत सामाजिक न्याय समता पर्वाचे आयोजन

जालना दि. 3 (जिमाका) :- सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत शासकीय विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यात सामाजिक न्याय समता पर्वाचे दि. 1 एप्रिल ते 1 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी सहभाग नोंदवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीमध्ये सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत. दि. 1 ते 30 एप्रिल दरम्यान जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र वाटपाबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करावे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरीत करणेबाबत शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, जालना यानी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाविषयी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा शासकीय अभियोक्ता यांनी कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरीक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार व अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती, ऊसतोड कामगारांना व तृतीयपंथी नाव नोंदणी, ओळखपत्र वाटप, आरोग्य शिबीर, जनजागृती शिबीर, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना व मुख्याधिकारी, नगर परिषद/ नगर पंचायत यांनी विशेष मोहिम राबविण्यात यावी. दिव्यांग यांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी विशेष मोहिम राबवून कार्यवाही करावी. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेमधून कमीत कमी 50 अशा अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांची आदर्श वस्ती निर्माण करणे बाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा उद्योग केंद्र, जालना व जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक यांचेमार्फत नवउद्योजकांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे तसेच व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत कार्यवाही करावी. सर्व कार्यक्रम व शिबीरांच्या कार्यक्रमास पूर्व प्रसिध्दी द्यावी. जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल व सामाजिक न्याय समता पर्व ही शासनाची योजना जास्तीत नागरिकांपर्यंत पोहचेल, अशा सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केल्या. या बैठकीस विविध शासकीय विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment