जालना, दि.
18 (जिमाका) :- “सामाजिक
न्याय समता पर्व” अभियानाअंतर्गत
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद
साधण्यासाठी शुक्रवार, दि.21 एप्रिल 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे शिबीर व ज्येष्ठ
नागरिक मेळाव्याचे आयोजन जालना नगर परिषदेच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सभागृहात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शिबीरास व मेळाव्यात
सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात व शिबिरात तज्ञ डॉक्टरांचे पथक आरोग्य तपासणी करणार
आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड तर
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी संतोष खांडेकर व एल्डर लाईन राष्ट्रीय
हेल्पलाईनचे स्वप्नील बारहाते उपस्थित राहणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment