Thursday 6 April 2023

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा सुधारीत जालना जिल्हा दौरा

 


 

जालना दि. 6 (जिमाका) :-  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शनिवार, दि. 8 एप्रिल 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे  आहे.

दि. 8 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.15 वाजता हेलिपॅड माळेगांव ता. मंठा, जि. जालना येथे आगमन व श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगावकडे प्रयाण,  दुपारी 12.30 वाजता श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगांव येथे आगमन व विश्व बंजारा दिवस व हनुमान जयंतीनिमित्त आयोजित श्री. गीता रामायण सत्संग ज्ञानयज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.20 वाजता श्री. हरि हर चैतन्य सेवा धाम, माळेगाव येथून हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता हेलिपॅड माळेगांव, येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment