Wednesday 12 April 2023

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


जालना, दि. 12 (जिमाका) :-  राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळावा राज्यात स्वयंरोजगारास पुरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात लघु उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी केले आहे.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत प्रकल्प व निर्मिती प्रकल्पांसाठी  कमाल 50 लाख रुपये व सेवा कृषी पुरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल 20 लाख रुपये मर्यादा किंमत राहील. योजना शहरी भागात जिल्हा उद्योग केंद्र तर ग्रामीण भागासाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय एकत्रीत समन्वय व सनियंत्रण, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ही यंत्रणा अंमलबजावणी करतील. 10 ते 25 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण तर 25 लक्षावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असावी. योजनेच्या लाभासाठी  छायाचित्र, जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, हमीपत्र, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी लोकसंख्या प्रमाणपत्र आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment